बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील प्रत्येक सदस्याला महाराष्ट्राकडून भरभरुन प्रेम मिळालं आहे. टिक टॉक स्टार आणि रिल स्टार सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरात आल्यावर महाराष्ट्राचं प्रेम मिळत आहे.
बिग बॉस मराठी सीझन ५च्या विनर ट्रॉफीवर सूरजने आपलं नाव कोरलं आहे.. या संपूर्ण सीजनबद्दल मराठी चाहत्यांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या सूरज चव्हाणची क्रेझ निर्माण झाली होती. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती.त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून त्याला 14 लाख रूपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणसोबत थेट चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. लवकरच सूरज चव्हाण अभिनेता म्हणून या नव्या चित्रपटात दिसणार आहे.
बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात जिंकल्यानंतर सुरज चव्हाणनं माध्यमांशी संवाद साधला. आपल्या झापुक झुपुक स्टाईलमध्ये त्यानं माध्यमांना उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार…ते आज खरं झालं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!’
जिंकलेल्या १४.६ लाखांचं सुरज काय करणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला तेंव्हा त्यानं घर बांधणार असल्याचं सांगितलं. तो म्हणाल, मला घर बांधायचंय त्यामुळे ही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरणार आहे. त्या घराला म्हणजेच घर बांधून झाल्यावर मी माझ्या घराला ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे.
सुरजच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा, देव तुम्हाला नेहमी आशीर्वाद देईल.