भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात हैदराबाद येथे टी 20 सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला गेला. टीम इंडियाने या सामन्यात 297 धावा करून बांगलादेशला 164 धावांवर रोखले. यासह भारताने टेस्ट सीरिजनंतर आता टी 20 सीरिज सुद्धा 3-0 ने आघाडी घेत जिंकली आहे. भारताने बांगलादेशला क्लीन स्वीप दिले असून भारताने सीरिजच्या शेवटच्या सामन्यात 10 मोठे रेकॉर्डस् केले आहेत.
भारतने बांगलादेश विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तब्बल 297 धावा केल्या. हा आयसीसीचे सदस्य आणि टेस्ट खेळणाऱ्या कोणत्याही देशाच्या क्रिकेट टीमने टी 20 मध्ये केलेला सर्वात मोठा स्कोअर होता. यापूर्वी केवळ नेपालने टी 20 क्रिकेटमध्ये याहून मोठा स्कोअर केलाय पण ते टेस्ट प्लेईंग नेशन नाही. नेपाळच्या टीमने 2023 मध्ये मंगोलिया विरुद्ध 314/3 असा स्कोअर केला होता. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोअर केलेल्या संघांमध्ये नेपाळ भारतनंतर अफगाणिस्तानचा समावेश आहे. अफगाणिस्तानने 2019 मध्ये देहरादून येथे आयर्लंड विरुद्ध खेळताना 278 धावा केल्या होत्या.
बांगलादेशने भारताविरुद्ध 7 विकेट गमावून 164 धावा केल्या. याप्रकारे शनिवारी झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश टी 20 सामन्यात एकूण 461 धावा झाल्या. ही या देशांमध्ये खेळवण्यात आलेल्या टी 20 सामन्यांमधील सर्वाधिक धावसंख्या होती. यापेक्षा जास्त धावा फक्त एकदाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात करण्यात आल्या. देहरादूनमध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात हा चमत्कार घडला होता. त्यानंतर दोन्ही संघांनी मिळून एकूण 472 धावा केल्या होत्या.
भारताने 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या सीरिजमध्ये तब्बल 10 वेळा एखाद्या टीमला क्लीन स्वीप दिलं आहे. भारताने 34 पैकी 10 सीरिजमध्ये हा पराक्रम केला असून पाकिस्तान या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाने 32 पैकी 8 सीरीज मध्ये विरुद्ध संघाला क्लीन स्वीप दिले.
भारताने या सामन्यात एकूण 47 बाउंड्रीज मारल्या. यात 25 चौकार आणि 22 सिक्सचा समावेश होता. अशाप्रकारे भारताने डावात चौकार आणि सिक्ससह एकूण 232 धावा केल्या. कोणत्याही T20 किंवा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चौकारांवरून सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. याआधी 212 धावांचा आंतरराष्ट्रीय विक्रम नेपाळ विरुद्ध मंगोलिया सामन्याच्या नावावर होता. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात एकूण 69 चौकार मारले गेले.
भारताने पॉवरप्लेमध्ये सुरुवातीच्या 6 ओव्हर्समध्ये एक विकेट गमावून 82 धावा केल्या. यासोबतच भारताने स्वतःच्याच वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने यापूर्वी 2023 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये इतक्याच धावा केल्या होत्या. हैदराबादमध्ये भारताने बांगलादेश विरुद्ध तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना 22 सिक्स ठोकले. भारताकडून संजू सॅमसन याने 111 धावा करताना 11 चौकार आणि 8 षटकार लगावले. टेस्ट प्लेइंग नेशनपैकी आतापर्यंत केवळ वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानला एका इनिंगमध्ये 22 सिक्सर मारता आले होते. तर टी 20 क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक 26 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड नेपाळच्या नावावर आहे. त्यांनी मंगोलियाविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती.
भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनने ओपनिंग करताना अवघ्या 40 चेंडूत शतक ठोकले. कर्णधार रोहित शर्मा (35) नंतर कोणत्याही भारतीय फलंदाजाचे हे सर्वात वेगवान टी-20 आंतरराष्ट्रीय शतक आहे. या कामगिरीसाठी संजूला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला.
1 thought on “IND VS BAN : टीम इंडियाची रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच”
Comments are closed.